आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहणखेडा, आखतवाडा ग्राम पंचायत बिनविरोध:उर्वरित 5 ग्रापंमध्ये सरपंच, सदस्यांसाठी प्रत्येकी 9 जणांची माघार

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी 18 सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अमरावती तालुक्यातील रोहणखेड व तिवसा तालुक्यातील आखतवाडा ग्रामपंचायतीने बाजी मारली असून तेथील सर्व उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्याचवेळी उमेदवारी दाखल न झाल्याने आखतवाडा ग्रामपंचायतीच्या एका सदस्यासह सरपंचपद रिक्त राहणार असून उर्वरित पाच सरपंच व सदस्यांच्या 39 जागांसाठी उमेदवारी दाखल केलेल्यांपैकी प्रत्येकी 9 जणांनी मैदान सोडले आहे.

सध्या 5 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 24 तर सदस्यांच्या 39 जागांसाठी 110 उमेदवार मैदानात आहेत. सातही ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 33 तर सदस्य पदासाठी 121 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. छाननीदरम्यान सरपंचांचे सर्व अर्ज योग्य ठरले. तर सदस्यांसाठीचे दोन अर्ज नामंजूर झाल्याने 119 जण मैदानात उरले होते. त्यापैकी प्रत्येकी 9 जणांनी माघार घेतल्यामुळे आता सरपंचांसाठी 24 तर सदस्य पदासाठी 110 उमेदवार मैदानात आहेत.

सदर निवडणुकीसाठी माघार घेण्याचा अंतीम दिवशी असे चित्र निर्माण झाल्याने आता पाच ग्रामपंचायतींचा अंतीम निकाल काय लागतो, यासाठी 19 सप्टेंबरची वाट बघावी लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्याच्या अमरावती (रोहणखेडा), चांदूररेल्वे (चांदूरवाडी) व धारणी (हरिसाल) तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतसह तिवसा तालुक्यातील घोटा, कव्हाडगव्हाण, उभरखेड व आखतवाडा या चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आगामी 18 सप्टेंबर रोजी होत आहे.

सरपंचपद थेट जनतेतून निवडायचे असल्याने या निवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. हरिसाल ही 11 सदस्यीय ग्रामपंचायत असून इतर सर्व ग्रामपंचायती सात सदस्यीय आहेत. या सर्व ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी दाखल करण्याचा १ सप्टेंबर हा शेवटचा दिवस होता. सातही ग्रामपंचायतींच्या 53 सदस्यपदांसाठी 121 तर आखतवाडा वगळता उर्वरित 6 सरपंचांसाठी 33 अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारनंतर आता अनुक्रमे 24 व 110 उमेदवार मैदानात आहेत. यापैकी कोण बाजी मारणार, हे मतदानाअंती स्पष्ट होणार आहे.

आखतवाड्याचे सरपंचपद रिक्त

ओबीसीच्या (नागरिकांचा मागासप्रवर्ग) एकाही उमेदवाराचा अर्ज प्राप्त न झाल्यामुळे तिवसा तालुक्यातील आखतवाड्याचे सरपंचपद व एक सदस्यपद रिक्त राहणार आहे. ही दोन्ही पदे नामाप्र संवर्गाच्या महिलांसाठी राखीव आहेत. मुळात या गावात नामाप्र संवर्गात मोडणाऱ्या जातीतील नागरिक रहात नाहीत. त्यामुळे त्या गावातून नामाप्र. संवर्गासाठी एकाही महिलेला उमेदवारी दाखल करता आली नाही.

बातम्या आणखी आहेत...