आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:फुले महाविद्यालयातील रोशनी बावणे‎ हिची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड‎

शेंदुरजनाघाटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड येथील महात्मा फुले कला,‎ वाणिज्य व सितारामजी चौधरी विज्ञान‎ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील‎ स्वयंसेविका रोशनी बावणे हिची उच्च व तत्र शिक्षण‎ विभागातर्फे आयोजित‎ राज्यस्तरीय सामाजिक व‎ सांस्कृतिक स्पर्धा उत्कर्ष‎२०२२-२३ साठी रासेयोच्या‎ विद्यापीठ पथकात निवड‎ ‎ करण्यात आली आहे. ही स्पर्धा‎ पुण्यश्लोक अहिल्यादेवी‎ होळकर विद्यापीठ, सोलापूर येथे २ ते ५ जानेवारी‎ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

सदर‎ स्पर्धेमध्ये रोशनी बावणे ही एकल नृत्य व गायन सादर‎ करेल. या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. जी.एन. चौधरी‎ यांनी आनंद व्यक्त करत रोशनी बावणे हिने‎ महाविद्यालयाचे नाव राज्यस्तरावर पोहोचवल्याबद्दल‎ तिचे अभिनंदन केले. तिला प्रा. डॉ. अतुल वंजारी,‎ डॉ. रीना बकाले, डॉ. अहमद शेहजाद आदी‎ प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. या निवडीबद्दल तिचे‎ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर‎ कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...