आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिका:डीडीआर यांच्या न्यायालयात धाव; महिला सहकारी बँक निवडणुकीतील ते 17 उमेदवार हायकोर्टात याचिका दाखल करणार

अमरावती2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी नाकारलेल्या १७ महिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. या महिलांनी पूर्वी डीडीआर यांच्या न्यायालयात धाव घेतली होती. तेथे जुनाच निर्णय कायम राखला गेल्याने आता त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात जाण्याची तयारी करीत आहेत. या संदर्भात काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या अर्चना सवाई यांनी ही शक्यता व्यक्त केली असून लवकरच दावा दाखल करु, असे म्हटले आहे.

शेअरची अपूर्ण रक्कम आणि इतर कारणांमुळे उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी या १७ महिला उमेदवारांचे अर्ज फेटाळले होते. त्यामुळे त्यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्या न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले होते. परंतु बुधवारी निकाल देताना जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर यांच्या न्यायालयानेही जुनाच निर्णय कायम ठेवत अर्ज फेटाळल्याच्या कृतीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता या उमेदवार महिलांकडे उच्च न्यायालयात दाद मागण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २९ जून असून त्या तारखेच्या आत महिलांन उच्च न्यायालयात धाव घ्यावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...