आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा:धावत्या ‘एसटी’ने घेतला पेट; 35 प्रवासी बचावले ; सायंकाळी चार वाजता घडली घटना

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतला. या बसमध्ये ३५ प्रवासी होते. सुदैवाने मात्र कोणालाही इजा झाली नाही. या आगीत बसचा मात्र काही वेळातच कोळसा झाला. ही घटना नागपूर महामार्गावर अमरावतीपासून २५ किलोमीटर अंतरावरील पिंपळविहीर येथे मंगळवारी (दि. १) सायंकाळी चार वाजता घडली.

नागपूरातील गणेशपेठ आगाराची निमआराम बस क्रमांक एम. एच. १४ बीटी ४४१७ अकोल्याहून नागपूरकडे प्रवासी घेऊन जात होती. बस अमरावती वरुन निघाल्यानंतर २५ किलोमीटर पुढे पिंपळ विहीर गावाजवळ पोहाेचताच, इंजिनमध्ये आवाज झाला व धूर निघायला लागला. त्यामुळे बसचालक तुषार अशोक आम झरे यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला लावली आणि काय झाल हे पाहिले. त्यावेळी बोनेटमधून आणखी धूर निघायला लागला. त्यांनी तत्काळ वाहक नीलेश वासुदेव वरेटवार यांना सांगितले. त्यामुळे चालक व वाहनांनी बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवले आणि बसपासून लांब अंतरावर जाण्यास सांगितले. काही क्षणातच बसने अचानक पेट घेतला. बसच्या केबिनमधून सुरू झालेली आग पाहता पाहता क्षणार्धात सर्वत्र पसरली. संपूर्ण बस आगीने धगधगत होती.

सुदैवाने बसच्या डिझेल टँकचा स्फोट झाला नाही, अन्यथा यापेक्षाही जास्त नुकसान झाले असते. बसने पेट घेतल्यामुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. माहिती मिळताच अमरावती वरुन अग्निशमन दलाचे जवान पाण्याच्या बंबासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तत्पूर्वी संपूर्ण बस जळून खाक झाली होती. दरम्यान आगीची माहिती मिळाल्यानंतर एसटीचे अमरावती विभागीय व्यवस्थापक नीलेश बेल सरे व अन्य अधिकारी घटनास्थळी पोहचले. यावेळी बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...