आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:मनपा निवडणुकीच्या चर्चेने धावपळ; इच्छुक, माजी नगरसेवकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल फुलमुळे कसा गोंधळ उडतो, याची प्रचिती नुकतीच शहरवासीयांना आली. मनपा निवडणुकीच्या निराधार चर्चेने शहरात सर्वत्र धावपळ सुरू झाली. इच्छूक आणि माजी नगरसेवकांनी तर चांगलीच पळापळ केली. याला फोन कर, दुसऱ्याशी बोल, तिसऱ्याला विचार, खात्री करून घे, असे त्यांचे सुरू होते. १ एप्रिलला एप्रिल फूल बनवण्यासाठी मुंबईतील एका वृत्तपत्राने खोडसाळपणा केला. ही बातमी २ एप्रिलला प्रसार माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली. बरे या बातमीबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर खात्री करून घ्या, असे स्पष्ट लिहिले होते. ते वाचून अनेकांनी वेबसाइटची चाचपणी केली. परंतु, हाती काहीच लागले नाही. मनपातील निवडणूक अधिकाऱ्यांना तर अनेकांचे फोन आले. माजी नगरसेवक व इच्छुक एकमेकांना फोन करून बातमी खरी आहे, काय? अशी विचारणा दिवसभर करत होते.

यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. बरे वृत्तही निराधार होते, याची जाणीव असूनही अनेकांनी खात्री करून घेतली. अद्याप ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डाटाच राज्य शासनाने सुप्रीम कोर्टात सादर केला नाही. तर मग निवडणूक कोणत्या आधारे घेणार? शासनानेच तर निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला? असेही हे इच्छुक व माजी नगरसेवक हसून सांगत होते. कारण एका चुकीच्या वृत्तामुळे आपण एप्रिल फूल बनलो याची त्यांना जाणीव झाली होती. काहीही असले तरी या निराधार वृत्ताने शहरात खळबळ उडवली.

बातम्या आणखी आहेत...