आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात (सेफला) नुकतेच चार दिवसीय योग शिबिर व कला क्राफ्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पावची ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम, एरोबिक्सचे धडे देण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यशाळेदरम्यान विद्यालयात सकाळी सहा वाजता पासून योग, प्राणायाम, एरोबिक्सचे विद्यालयाचे शारीरिक शिक्षक शोभेराम जावरकर व राज रगडे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करत त्याचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व पटवून दिले. योग कार्यशाळेनंतर लगेचच सकाळी सात वाजता पासून कला क्राफ्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकावू वस्तू तयार केल्यात. या सोबतच विविध रंगीत कागदापासून सुंदर अशा सजावटीच्या वस्तूदेखील तयार केल्यात. त्यासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक अजय जिरापुरे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे विविध कलाकृती कशा घडवायच्यात याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांसाठी सायकल रॅली
शिबिराच्या समारोपीय दिवशी इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना आरोग्य व पर्यावरणाचे महत्त्व कळावे या उद्देशाने धामणगाव ते अशोक नगर अशा १२ किमी. सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये सायकल चालवण्याची आवड निर्माण करून आरोग्याच्या दृष्टिकोनातून सायकल चालवण्याचे फायदे व पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा या सायकल रॅली मधून संदेश देण्यात आला. सायकल रॅलीमध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
विद्यार्थ्यांनी राबवले स्वच्छता अभियान
अशोक नगर येथे विद्यालयातर्फे ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले. विद्यालयाचा माजी विद्यार्थी हनुमंत ठाकरे यांनी गाडगे महाराजांची वेशभूषा करून पथनाट्य सादर केले त्यातून ग्राम स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य गणेश चांडक, उपप्राचार्य मनोज हांडे, पर्यवेक्षक गोपाल मुंधडा व महाविद्यालयातील इतर शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, सरपंच स्नेहल कडू आदी उपस्थित होते. शिबिराला विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.