आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा मेळावा शिंदेच घेतील:नवनीत राणांची वादात उडी; म्हणाल्या - बाबासाहेबांनी सर्वांना समान अधिकार दिला...!

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दसरा मेळाव्यावरून शिंदे गट शिवसेनेत वाद सुरू असतानाच आता या वादात शिवसेनेशी राजकीय शत्रूत्व स्वीकारलेल्या नवनीत राणा यांनी उडी घेत बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारे एकनाथ शिंदे हेच दसरा मेळावा घेतील, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, दसरा मेळावा शिवसेनेनेच घ्यावा, असे काही नाही. त्यांनीच दसरा मेळावा घ्यावा, असे कुठेही लिहिलेले नाही. घटनेद्वारे बाबासाहेबांनी सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही दसरा मेळावा घेण्याचे अधिकार आहेत.

नवनीत राणा म्हणाल्या, बाळासाहेब ठाकरेंचे विचार एकनाथ शिंदे घेऊन जात आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा हीच राहील की, एकनाथ शिंदेच दसरा मेळावा घेतील. ठाकरेंनीच मेळावा घ्यावा असे काहीही नाही.

दोन्ही गटात रस्सीखेच

गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीमुळे तर शिंदे गट आणि शिवसेनेत दसरा मेळाव्यावरून उघड टीकाही केली जात आहे.

शिंदे गटाचा दसरा मेळावा 'बीकेसी'वर?

शिवाजी पार्कचे मैदान दसरा मेळाव्यासाठी कुणाला मिळणार हे निश्चित नाही. त्यानंतर आता शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानावर घेतला जाणार की काय, अशी चर्चा आहे. शिवाजी पार्कनंतर आता शिंदे गटाकडून बीकेसीतील मैदानासाठीही अर्ज करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...