आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या बी. ए. उन्हाळी परीक्षा 2022 मध्ये कु. साक्षी लक्ष्मणसिंग चव्हाण हिने घवघवीत यश संपादीत केले आहे. तिने विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत मराठी माध्यमातून नवव्या क्रमांकाचे स्थान मिळवले. तिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तिच्या या यशाबद्दल श्री. केशरबाई लाहोटी महाविद्यालयात तिचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य विजयकुमार भांगडिया यांनी साक्षीला पुष्पगुच्छ देऊन पुढील पदव्युत्तर शिक्षणासंबंधी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विशेष अतिथी माजी प्रबंधक श्री. कुसुंबिवाल यांच्यासह डॉ. संतोष राठोड, डॉ. के. के. गाडबैल, डॉ. रवींद्र शिरसाट, डॉ. दीपावली राऊत, प्रा. नितीन घायवट, प्रा. सुमित जोशी, प्रा. संदीप तांडील, प्रा. मनीषा खंडारे उपस्थित होते. सत्कार संमारंभामध्ये साक्षीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंदांना दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.