आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमेंटची विक्री:बडनेरा, चपराशीपुऱ्यात दर्जाहीन सिमेंटची विक्री

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एमआयडीसीमध्ये दर्जाहीन सिमेंटची रिपॅकिंग करून विक्री करणाऱ्याला पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने चार दिवसांपूर्वी पकडले होते. दरम्यान सद्या ताे पोलिसांच्या कोठडीत असून, त्याने मागील चार महिन्यांत एकूण ८०० ते ९०० बॅग विक्री केल्या आहेत. यापैकी सर्वाधिक बॅग बडनेरा आणि चपराशीपुरा भागात विकल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

ईशाक कासम कालीवाले याला पोलिसांनी धाड टाकून अटक केली. त्याने चार महिन्यांपासून एमआयडीसी परिसरात एक शेड भाड्याने घेऊन एक्स्पायर व दर्जाहीन सिमेंट कमी भावाने घेऊन ते गाळायचे व रिपॅकिंग करून विकायचे, असा व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान त्याने मागील चार महिन्यात ८०० ते ९०० बॅग दर्जाहीन सिमेंटची विक्री केली.

यात सर्वाधिक सिमेंट बडनेरा भागात विकले. यामध्ये एकावेळी १० ते २० बॅग तो देत होता, असे पोलिसांना त्याच्याकडून जप्त केलेल्या रेकॉर्डवरून समोर आल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली. मात्र प्रत्यक्षात त्याने किती बॅग विकल्या, तसेच ते सिमेंट घेणाऱ्यांनी कोणत्या कामासाठी वापरले, याचीही पोलिस माहिती घेत आहेत. कारण एक्स्पायर झालेल्या सिमेंटची ‘स्ट्रेन्थ’ कमी होते, त्यामुळे घर बांधकाम किंवा अन्य महत्त्वाच्या बांधकामात ते वापरणे धोकादायक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या सिमेंटचा वापर कुठे झाला, हा शोध घेणे महत्वाचे आहे. ईशाक कालीवाले आणि त्याला दर्जाहीन सिमेंटचा पुरवठा करणारा राहुल रतावा या दोघांची २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी आहे. त्यामुळे या दोघांकडून आणखी काय काय माहिती समाेर येणार, ते महत्वाचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...