आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैन धर्मियांचे आस्था केंद्र असलेले भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आज, मंगळवारी शहरात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. शोभायात्रा, रक्तदान शिबीर, फळ वाटप, शरबत वितरण, प्याऊचा प्रारंभ आदी लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून भगवान महावीर यांना अभिवादन करण्यात आले. सकाळी साडे सातच्या सुमारास जुना सराफा बाजार-भाजीबाजार स्थित जैन श्वेतांबर छोटा मंदिर येथून शोभायात्रा काढण्यात आली. भगवान महावीर यांची रथारुढ प्रतीमा व सोबत जयघोष करणारे जैन समाज बांधव अशी ही मिरवणूक होती. आबाल-वृद्धांसह महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हे या शोभायात्रेचे वैशिष्ट्य ठरले. पुढे गांधी चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, जवाहर गेट असे मार्गक्रमण करीत जैन श्वेतांबर बडा मंदिर येथे या शोभायात्रेचा समारोप झाला.
वाटेत जयस्तंभ चौक येथे दिवंगत पद्माबाई पारसमल चोरडिया यांच्या स्मृत्यर्थ त्यांचे सुपुत्र बिल्डर नवीन चोरडिया यांनी स्थापन केलेल्या प्याऊचे उद्घाटन करण्यात आले. प्याऊ सुरु करण्याचे हे सलग २२ वे वर्ष आहे. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या हस्ते या प्याऊचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इतर मान्यवरही उपस्थित होते. शोभायात्रेत जैन संस्कार युवा मंच, जैन महिला फाऊंडेशन, नाकोडा सेवा मंडल, राजापेठ मित्र मंडल, विचक्षण सखी मंच, खरतरगच्छ महिला संघ, ओसवाल जैन महिला संघ, ओसवाल बहु मंडल, श्री ओसवाल जैन नवयुवक संघ, जय जैनम परिषद, श्री सुशिल बहु मंडल आदीचे पदाधिकारी अॅड. विजय बोथरा, राजेश चोरडिया, जीतूभाई गोलछा, गौतम चोपडा, अजय बुच्चा, कांतीभाई गाला, डॉ. रवींद्र चोरडिया, कोमल बोथरा, मनीष संकलेचा, गौरव लुनावत, किरण बैद, सिद्धार्थ बोथरा, अंकीत बंबोरिया, महेंद्र भंसाली, हरिश खिंवसरा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.