आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा निकाल:इच्छाशक्तीच्या बळावर समृद्धी, लक्ष्मी, नीरज, अंशुल, प्रणवने घेतली भरारी; कुणी ऑनलाइन, तर कुणी खासगी शिकवणीचा घेतला आधार

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केलेल्या गुणवंतांपैकी कुणाला सीए व्हायचं, कुणी डॉक्टर होणार तर कुणी सैन्य अधिकारी बनून देशसेवा करु इच्छितो, हे स्पष्ट झाले आहे. केशरबाई लाहोटी महाविद्यालाची विद्यार्थिनी समृद्धी मुंदडा हिने ९८ टक्के गुण मिळवले असून, तिला सीए व्हायचं आहे. ब्रिजलाल बियाणी महाविद्यालच्या नीरज ककरानीया याने ९७.१७ टक्के गुण मिळवले असून, त्याला वैद्यकीय क्षेत्रात भरारी घ्यायची आहे. विद्याभारती महाविद्यालयाच्या प्रणव येवतीकर याने ९४.६७ टक्के गुण मिळाले असून त्याला सिव्हील इंजिनिअर व्हायचं आहे. धामणगावच्या सेफला महाविद्यालयाच्या ९७.१७ टक्के गुण मिळवणाऱ्या अंशुल शेलोकरला आर्मी ऑफिसर व्हायचं आहे. तर ९३ टक्के गुण मिळवणाऱ्या शिवाजी महाविद्यालयाच्या लक्ष्मी वाटाणे हिला सनदी अधिकारी व्हायचं आहे.

समृद्धी म्हणते मी आजोबांसारखी सीए होणार
९८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात बहुदा प्रथम स्थानावर असणाऱ्या केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या समृद्धी मुंदडाला स्वत:ला सीए म्हणून सिद्ध करायचे आहे. ती म्हणते, आजोबा राधावल्लभ मुंदडा सीए (चार्टर अकाऊंटंट) आहेत, त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मलाही सीए व्हायचे आहे. समृद्धीचे वडील राजेश मुंदडा हे वकील असून, आई कल्पना मुंदडा गृहिणी आहेत.

लक्ष्मी होणार सनदी अधिकारी
विद्यार्थ्यांना बारावीत यश संपादन करायचे असेल तर अकरावी अत्यंत महत्वाची आहे. अकरावी हा बारावीसाठीचा बेस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याकडे लक्ष द्यावे असे, शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या लक्ष्मी वाटाणे हिने सांगितले. तिला या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले असून ती महाविद्यालयाची टॉपर आहे. ती म्हणते, मी शिक्षकांनी सांगितलेल्या चुका सुधारत गेली. तसेच ऑनलाइन, यूट्यूबवर मी त्या- त्या विषयाचे व्हीडीओ बघितले. मी रोज ६ तास अभ्यास करायची, सोबतच प्रिलिंम्स सेशन अटेंड करायची. लक्ष्मीला अग्रीकल्चर फिल्ड निवडायची आहे. पुढे स्पर्धा परीक्ष देऊन सनदी अधिकारी झाल्यावर देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावायचा आहे.

प्रणवला व्हायचंय सिव्हिल इंजिनिअर
जीवनात असामान्य यश मिळवण्यासाठी असामान्य ध्येय असले पाहिजे. शिक्षक, मार्गदर्शक, आई-वडील नेहमी प्रेरणा आणि स्फूर्ती देतात. मात्र, विद्यार्थ्यांना स्वत:ला घडवायचे असेल तर शिक्षकांचे मार्गदर्शन महत्वाचे असल्याचे प्रणवसिंग येवतीकर म्हणतो. विद्याभारती महाविद्यालयाच्या प्रणवला ९४.६७ टक्के गुण मिळाले असून तो त्या महाविद्यालयाचा टॉपर आहे. तो म्हणतो, मला भविष्यात सिव्हील इंजिनिअर व्हायचे आहे. मला जे यश मिळाले, त्याला शिकवणी वर्ग व महाविद्यालयाचे मार्गदर्शन कारणीभूत आहे. या यशानंतरही पुढे आकाश मोकळे आहे. म्हणून एका यशाने हुरळून जाऊ नका आणि यशानंतर थांबूही नका, असे प्रणवसिंग सांगतो.

अंशुलचं ध्येय... आर्मी ऑफिसर
धामणगावच्या सेफला महाविद्यालयातून ९७.१७ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला अंशुल शेलोकर लहानपणापासून शांत स्वभावाचा व अभ्यासू प्रवृत्तीचा आहे. दहाव्या वर्गात सुद्धा त्याने अव्वल स्थान मिळवले होते. वडिलांची तयारी असतानाही त्याने शिकवणी लावली नाही. त्याला सैन्यात जाण्याची आवड आहे. त्याने घेतलेल्या परिश्रमामुळेच त्याला हे यश प्राप्त झाल्याचे अंशुलचे आई-वडील सांगतात. मला आर्मीतील मोठा अधिकारी व्हायचे असे अंशुल सांगतो.

बातम्या आणखी आहेत...