आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका वाहनावर कारवाई न करता, ते वाहन तुम्ही कसे साेडले, तसेच त्या वाहनातील वाळू एमआयडीसी परिसरात टाकल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी वाळू वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्याने वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षकांना दिली. या प्रकरणी वाहतूक शाखेचे (पश्चिम) पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांनी राजापेठ पोलिसात तक्रार दिली आहे.या तक्रारीवरून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) स्थानिक एमआयडीसी परिसरात घडली. सदर तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी शेख आमिन (रा. जुनीवस्ती, बडनेरा) याच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पाेलिस निरीक्षक आठवले हे शनिवारी पेट्रोलिंग करीत असताना एमआयडीसी चौकात त्यांना दोन ट्रकमधून क्षमतेपेक्षा अधिक वाळूची वाहतूक होत असल्याचे दिसले.
त्यांनी वाहने थांबवून कागदपत्रांची पाहणी केली असता एकाने त्यांच्यासमाेर येत स्वत:ची ओळख करुन देत शेख आमिन असे नाव सांगितले. मी वाळूचा व्यवसाय करत असून आपण पकडलेला ट्रक माझा आहे, तो सोडून द्या, असे तो म्हणाला. त्याला समजावून सदर वाहन वाहतूक शाखेत घेऊन जात असताना तिसरा ट्रक एमआयडीसीमध्ये जाताना आठवले यांना दिसला. ते वाहन थांबवून सदर ट्रक देखील वाहतूक कार्यालयात नेण्याची सूचना पाेलिस निरीक्षक आठवले यांनी संबंधित वाहनचालकाला केली. तेथून आठवले थोड्या अंतरावर आले असता वाहनचालक ट्रकमधील वाळू एमआयडीसीतच खाली करत असून, सदर वाहन वाहतूक शाखेत आणण्यास नकार देत असल्याची माहिती एका अंमलदाराने त्यांना दिली.
त्यामुळे पाेलिस निरीक्षक आठवले हे पुन्हा त्याठिकाणी पोहोचले. यावेळी तेथे पुन्हा आलेल्या शेख आमीन याने ‘तुम्ही माझी गाडी कशी घेवून जाता, मी पाहतो, एमआयडीसी परिसरात उभी असलेली एक गाडी त्याचठिकाणी खाली केल्या जात आहे. त्याचा व्हिडीओ मी घेतला आहे. तो व्हिडीओ व्हायरल करुन तुम्ही कशा गाड्या सोडता, हे सांगून बदनामी करतो, असे तो म्हणाला. या प्रकरणी शनिवारी सायंकाळी पाेलिस निरीक्षक आठवले यांनी याबाबत तक्रार दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.