आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांपुढे तोंडी‎ आक्षेपाचे परिणाम:स्वच्छता कंत्राट ; दुसऱ्यांदा‎ मुदतवाढ, काढले शुद्धिपत्रक‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाचे झोननिहाय स्वच्छता‎ कंत्राट हे मागील दोन‎ महिन्यांपासून चांगलेच चर्चेत‎ असून निविदा भरण्याची अंतिम‎ तारीख गुरुवार, ६ एप्रिल‎ असताना मनपाने बुधवार ५‎ रोजी शुद्धिपत्रक काढून निविदा‎ प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ दिली‎ आहे. ही मुदतवाढ देण्यामागे‎ काही वेगळेच कारण‎ असल्याची चर्चाही दिवसभरात‎ मनपा वर्तुळात रंगली. सातत्याने‎ विरोध होत असतानाही मनपा‎ प्रशासनाने झोननिहाय स्वच्छता‎ कंत्राटाला हिरवी झेंडी देत ३‎ मार्च रोजी निविदा जारी केली.‎ त्यानंतर २६ मार्च रोजी पहिले‎ शुद्धीपत्रकही काढण्यात आले.‎ त्यानुसार निविदा भरण्याची‎ अंतिम तारीख ६ एप्रिल व‎ निविदा उघडण्याची अंतिम‎ तारीख १० एप्रिल निश्चित‎ करण्यात आली. परंतु, काही‎ इच्छुक कंत्राटदारांची‎ निविदेतील अटीं-शर्तींसाठी‎ तयारीच झाली नसल्याने त्यांनी‎ यावर अधिकाऱ्यांपुढे तोंडी‎ आक्षेप घेतल्यामुळेच आता‎ पुन्हा मुदतवाढ देण्यात‎ आल्याची सध्या जोरदार चर्चा‎ आहे.‎ निविदा प्रक्रियेत तांत्रिक‎ अडचण असल्यास किंवा‎ अपेक्षित प्रमाणात निविदा‎ आल्या नसतील तर शुद्धिपत्रक‎ काढून मुदतवाढ दिली जाते.‎