आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तृत्व स्पर्धा:कोल्हापूरच्या संकेतने पटकावला पहिला क्रमांक ; सम्यक संबोधी संस्थेचा संयुक्त उपक्रम

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्थक वक्तृत्व अकॅडमी व सम्यक संबोधी संस्थेच्या संयुक्त सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूरच्या संकेत पाटील याने प्रथम पारितोषिक पटकावून ‘प्रोफेसर डॉ. एम. आर. इंगळे वक्तृत्व करंडक २०२२’ हा बहुमान प्राप्त केला. देशातील सद्याची परिस्थिती पाहता संवेदनशील समाज निर्माण होण्यासाठी विचारशील आणि कृतीशील पिढी तयार व्हावी, या प्रामाणिक हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तरुणांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक संकेत पाटील (कोल्हापूर), द्वितीय क्रमांक यश पाटील(मुंबई), तृतीय क्रमांक अक्षय इळके (इचलकरंजी) यांनी पटकावला तर प्रोत्साहनपर पारितोषिक मंदार लटपटे ( परभणी), सारांश सोनार (कोल्हापूर), वैष्णवी अतकरे (नागपूर), पवनलाल हुकरे ( भंडारा), विशाल खर्चवाल ( नागपूर) यांनी पटकावली. वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक म्हणून डॉ. राजेश देशमुख, संजय कमल अशोक, चंद्रकांत झटाले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे हे होते. तर विचारमंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. संदीप भोवते, प्रोफेसर डॉ. एम. आर. इंगळे, संगीता इंगळे, डॉ. बी. एस. इंगळे उपस्थित होते. डॉ. एम. आर. इंगळे यांनी ही स्पर्धा निरंतर सुरू राहील आणि महाराष्ट्रात मानाचे स्थान प्राप्त करेल, असे सांगून स्पर्धेला वाढता प्रतिसाद बघता अजून स्पर्धेला सर्वदूर पर्यंत पोहाेचवण्याचे काम करु, असे प्रतिपादन केले.

देशातील समस्यांवर चिंतन करण्यासाठी महाराष्ट्रातील तरुण एकत्रित आले हेचं तरुण जागृत आहेत, याचे लक्षण आहे. विचारांचा जागर घालणारी ही स्पर्धा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी हागोणे हिने केले तर आभार विशाल नंदागवळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. मनोहर वासनिक, प्रा. राहुल माहुरे, प्रा. आकाश हराळ, विशाल इंगळे, अमित लोंढे, आदीत्य बावनगडे, नागसेन अंभोरे, अभय तायडे, भरत चांदवडकर, सागर तायडे, रोहन काळे, अमित वाहूरवाघ, शशिकांत इंगळे, नागेश वाहुरवाघ, सागर वारके, यश तिवारी, चेतन डोंगरे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...