आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोविस तास पाणी:केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून संतनगरीला २४ तास पाणी मिळणार; आ. डॉ. संजय कुटे यांची ग्वाही

शेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील पाच वर्षात शहरातील प्रत्येक भागाचा, समाजाचा विकास पालिकेने केला आहे. केंद्र सरकारच्या आध्यात्मिक शहरासाठी असलेल्या अमृत योजनेत राज्यातून तीन आध्यात्मिक शहरांची निवड केली असून, त्यामध्ये शेगाव शहराचा समावेश केल्याने २३० कोटी रुपये खर्चास तत्वतः मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या योजनेतून शहरात येणाऱ्या प्रत्येक भाविकास व नागरिकास चोविस तास पाणी मिळेल, अशी ग्वाही आमदार संजय कुटे यांनी दिली.

येथील वॉर्ड १३ मध्ये अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेतून सात कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील वाढीव वस्तीस ५० कोटींचा निधी दिवाळीपर्यंत मिळेल, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांकडे वेग, वेळ, काळ, नियोजन, व्हिजन आणि संकल्प हे रसायन असल्याने राज्याचा विकास अधिक झपाट्याने होणार आहे. संतनगरीच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध होतो आणि राहणार असल्याचे कुटे यांनी सांगितले. कार्यक्रमाला भाजप नेते शरद अग्रवाल, पांडुरंग बूच, गजानन जवंजाळ, रविकांत पाटील, पवन शर्मा, सुषमा शेगोकार, अशोक चांडक, राजेंद्र कलोरे, ज्ञानेश्वर साखरे, मंगला चव्हाण, रत्नमाला ठवे, रजनी पहूरकर, संतोष घाटोळ, संतोष लिप्ते, पुरुषोत्तम शेगोकार, राजेंद्र शेगोकार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी समाज सेवक नितीन शेगोकार, भास्कर शेगोकार, नारायणराव शेगोकार, उमेश राजगुरे, योगेश नळेकर, प्रमोद काठोळे, मनोहर शिरसाठ, रवी शिरसाठ, अमोल शेगोकार, अंबादास गवई, कैलास तायडे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...