आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या अकरा वर्षांपासून भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती मांवनदना हा ऐतिहासिक कार्यक्रम सायन्सकोर मैदान येथे आयोजित करण्यात आला. यावेळी पहिल्या दिवशी भीमा कोरेगाव प्रतिकृती विजय स्तंभाला हजारो भीम अनुयायांनी मांवनदना दिली. त्यानंतर प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी सोमवारी( दि.२) रोजी सायंकाळी एक हजार बुद्ध विहार समित्यांचा सत्कार समारंभ तसेच चंद्रकांत शिंदे, कडू खरात, कुणाल इंगळे, अमोल घोडके, प्रशांत मोहिते आदी महागायकांचा महासंग्राम असलेल्या भीम गीतांच्या कार्यक्रमाने उपस्थित नागरिकांची मने जिंकली. तर मंगळवारी शेवटच्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. १ ते ३ जानेवारी दरम्यान झालेल्या महामहोत्सवात पहिल्या दिवशी रविवारी सायंकाळी समता सैनिक दल, माजी सैनिकांसह शेकडो भीम अनुयायांनी भीमा कोरेगांव विजयस्तंभ प्रतिकृतीला परेड व बिगुल वाजवून मानवंदना देण्यात आली. दुसऱ्यादिवशी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून १८१८ च्या शौर्य गाथेच्या लढाईचे सरसेनापती सिद्धनाक यांचे बारावे वंशज मिलिंद इनामदार उपस्थित होते.
तसेच या दरम्यान समता सैनिक दलाचे पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. याशिवाय समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. २ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता पासून १ हजार बुद्ध विहार समित्यांचा सत्कार सोहळा तसेच मान्यवरांचा सत्कार घेण्यात आला. रात्री आठ वाजल्यापासून महागायकांचा महासंग्राम कार्यक्रम पार पडला तर आज ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती पर्वावर विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी माजी लेडी गव्हर्नर कमल गवई, मंदाकिनी बागडे, मेघा ढबाले, कोकिळा वानखडे, आशा थोरात, कल्पना मोरे, सोनल चव्हाण, सरपिता तलवारे, त्रिवेणी मकेश्वर, भारती गुडधे, अर्चना थोरात, वैशाली पाटील, रेशमा सरदार, शीला इंगळे, सुनीता गोळे, कुंदा डांगे, चंद्रकला खांडेकर, रमा सोनोने, बेबी नितनवरे आदी उपस्थित होते. संचालन कांचन आडोळे तर आभार सोनल चव्हाण यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.