आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगरुळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक संस्था वनोजा व्दारा संचालित श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय वनोजा येथे ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना व महिला सक्षमीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. महिला सक्षमीकरण कक्षाच्या समन्वयक व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. ममता पाथ्रीकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केले आणि समाजातील अनिष्ट प्रथा समूळ उखडून टाकण्यासाठी प्रयत्न केलेत.
तसेच महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे काम सावित्रीबाईंनी केले, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी प्रा. गजानन बढे, संत गजानन महाराज कला महाविद्यालय बोरगाव मंजू तसेच डॉ. धाकुलकर, वसंतराव नाईक महाविद्यालय मंगरूळपीर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला डॉ. गजानन घोंगटे, प्रा. जयप्रभा भगत, प्रा. दिपक भगत, प्रा. बापूराव डोंगरे, डॉ. सचिन कडू, प्रा. धनंजय पाथ्रीकर, प्रा. दिलीप मुंडे, डॉ. कुटे, प्रा. तृषाल राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने उपस्थित विद्यार्थांना पेनचे वाटप करण्यात आले. यासाठी महिला सक्षमीकरण सदस्य कु वैष्णवी पाटील, मंजूषा इंगोले, पूनम वानखडे, तृप्ती जिंकटवर, वैष्णवी राऊत, ज्ञानेश्वर खडसे, आदित्य इंगळे या विद्यार्थ्यांनि परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.