आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात करून विविध क्षेत्रांमध्ये शैक्षणिक, सामाजिक क्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणfक आणि सामाजिक विचार महिलांसाठी दिपस्तंभासारखे असून विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन भरारी घ्यावी, असे मनोगत भूमिपुत्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले. मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव, वार्षिक स्नेहसंमेलन तसेच सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
या प्रसंगी उद््घाटक म्हणून भूपेंद्र मुधोळकर, जयंत मोरे, रोहित सोनटक्के, क्षितिज अभ्यंकर, सतीश फुंडकर, दिनेश मोहोळ, संजय तट्टे, अर्चना तट्टे, प्राचार्य गजानन वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी भूपेंद्र मुधोळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत गुरूजनांचा आदर्श घेवून शिक्षणासोबतच व्यवहारी जीवनात उतुंग भरारी घ्यावी व आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गजानन वानखडे यांनी केले. या प्रसंगी विद्यालयाचे सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक संजय तट्टे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून सपत्निक सत्कार करण्यात आला.
या वेळी विचारपीठावर प्राचार्य अविनाश पवार, प्रा. उद्धव कोकाटे, अतुल कोल्हे, वासुदेव भांडे, उज्वला वानखडे, मंगला वंजारी, आशा देशमुख, सुचिता गावंडे, वासुदेव वानखडे, वाल्मीक डोंगरे, सुरेश दहिकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर गावंडे, तर आभार प्रदर्शन संजय श्रीखंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुबोध कराळे, वैशाली चौधरी, सोपान चोरपगार, राजू वाकोडे, मीनाक्षी बनसोड, शीतल मानेकर, मीनाक्षी सरवटकर, दशरथ वानखडे, मनोजकुमार शिरभाते, बाळू अवघड, जीवन फसाटे, विवेक अभ्यंकर, बाबुराव चक्रे आदीनी अथक परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.