आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्त्री-शिक्षणाची जाज्वल्य ज्योत अखंड तेवत ठेवत सावित्रीबाई फुले यांनी रूढी-परंपरांच्या अंधारात चाचपडणाऱ्या स्त्रियांच्या सबलीकरणाचा मार्ग प्रकाशमान केला. त्यांचे संपूर्ण जीवन हे सामाजिक उत्थानाचा वसा घेऊन शैक्षणिक आणि अस्पृश्यता निवारण कार्यासाठी समर्पित केले. देशाला क्रांतीची नवी वाट दाखवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने भारतीय महिलांचा आत्मसन्मान वाढला, असे प्रतिपादन सहयोग फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता इंगोले यांनी मंगळवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी केले.
स्थानिक जुनी आययूडीपी वाशीम सहयोग फाउंडेशनच्या जिल्हा कार्यालयात सहयोग फाउंडेशन व नारीशक्ती, बेटी बचाव बेटी पढाव अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी सहयोग फाउंडेशन अध्यक्षा संगीता इंगोले, नारीशक्ती फाउंडेशनच्या अमरजित कौर कपूर व सदस्या वृषाली टेकाळे, रेखा रावले, सिमरन हरचंदानी, कशिश केसवणी, रितू केसवणी, संतोष अग्रवाल, बेबी खडसे उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.