आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात उद्या १६५ केंद्रांवर शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये इयत्ता पाचवीचे ९ हजार ७११ तर आठवीचे ८ हजार ३९६ विद्यार्थी परीक्षेस पात्र आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पाचवी व आठवीकरिता २० जुलै रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर शिष्यवृत्तीची परिक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्याने परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता ही परिक्षा रविवारी (दि.३१) होत आहे.
राज्य परिक्षा परिषद पुणेच्या वतीने राज्यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी करिता घेण्यात येणारी शिष्यवृत्तीची परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आली होती. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर परीक्षा ३१ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी करिता जिल्ह्यात ९१ केंद्रे निर्धारित करण्यात आले. तसेच आठवी करिता ७४ केंद्र निश्चित केले आहे. त्यासोबतच १६५ केंद्र संचालक व ९०९ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहे. जिल्हास्तरावर २ तर प्रत्येक तालुक्यात एक एक भरारी पथक नेमण्यात आले आहे. अशी माहीती शिक्षणाधिकारी (प्राथ.) प्रिया देशमुख यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.