आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:आजपासून शाळेची वेळ सकाळी सात ते साडेअकरा; उन्हाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा आदेश

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील पहिली ते अकरावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या जि. प., खासगी, माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. बुधवार, दि. ६ एप्रिलपासून सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा सकाळी सात ते साडेअकरापर्यंत भरणार आहेत. उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने शाळांच्या वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी पालक, शिक्षक संघटनांमधून होत होती. प्रशासनाने अखेर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिक्षकांना दुपारी साडेबारापर्यंत उपस्थित राहून शाळेचे कामकाज पाहावे लागणार आहे, तसे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

कोरोनाच्या काळात शालेय अध्यापन कार्य प्रभावित झाल्याने ३० एप्रिलपर्यंत शाळा पूर्णवेळ चालवण्याचा आदेश शासनाने घेतला होता. जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढत असून, तापमान ४५ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला. या निर्णयाविरुद्ध शिक्षकांसह पालकांमधून ही रोष व्यक्त होता. पालक आणि शिक्षक संघटनांकडून हा निर्णय बदलण्याची मागणी करण्यात आली होती.

उष्णतेची लाट बघून शाळेच्या वेळात बदल
सध्या जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. वेळ बदलण्याची मागणी पालकांसह शिक्षक संघटनांकडून होत होती. त्यानुसार शाळांच्या वेळात बदल करण्यात आला आहे.
प्रफुल्ल कचवे, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जि.प., अमरावती.

बातम्या आणखी आहेत...