आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागातील शाळा, आरोग्याची समस्या तत्काळ निकाली काढा:अचलपूर तालुक्यातील सरपंचाची वज्रमूठ, संयुक्त आंदोलनाचा इशारा

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूर तालुक्यातील आरोग्य व शिक्षणाच्या व्यवस्थेकडे प्रशासनाद्वारे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक अवस्था अत्यंत खालावली आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा योग्यप्रकारे मिळत नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्या तत्काळ निकाली काढाव्या, यासाठी अचलपूर तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांच्यासह सदस्यांनी तालुक्याच्या प्रशासकीय प्रमुखाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अचलपूर तालुकयातील ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी शाळा आहेत तर शिक्षक नाही आणि काही ठिकाणी वर्ग खोल्या नाहीत तर शिक्षक आहेत. दुसरीकडे तालुक्यातील ४३ वर्गखोल्यांची अवस्था वाईट झालेली आहे. बांधकामाकरीता निधीची गरज आहे. शिक्षणाची सांगड विस्कळीत झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणीक दर्जा खालावलेला आहे. हीच बाब तालुक्यातील आरोग्य विभागालाही लागू पडते. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये वैद्यकीय सुविधा अपूर्ण आहेत. सर्वत्र कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. या सर्व समस्यांच्या निराकरणाबाबत योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. प्रशासनाला अनेकदा उपाययोजना करण्‍याबाबत लेखी स्वरुपात निवेदन देऊनसुध्दा कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळेच सरपंच, उपसरपच व सदस्यांनी एकत्रीत येऊन तालुका प्रशासन प्रमुखाला पत्र लिहिले. या पत्रानुसार योग्य ती उपाययोजना करण्यासाठी २१ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्या दरम्यान व्यवस्था न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी सरपंच विजय ढेपे (हनवतखेडा), नलिनी पवार (बोपापूर), राहुल सालफळे (बोरगांव पेठ), स्वाती लोखंडे (म्हसोना), बाबा साकोम (कविठा), उपसरपंच अर्चना इंगळे (कविठा), गंगा धंडारे (कांडली), बंडु वानखडे (भुगांव), सदस्य निलेश जाधव कविठा, सचिन कुबडे बोपापूर, अमोल लादे भूगांव, सतीश पातोंड कविठा, संजय शेकोकार बोपापूर, निलीमा चौधरी, गजानन अवसरमोल आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...