आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Sealing Of Experts At The Planned Site At Nandgaon Peth For GMC; Information Presented To The Guardian Minister By A Committee Of Experts |marathi News

अमरावती:‘जीएमसी’साठी नांदगाव पेठ येथील नियोजित जागेवर तज्ज्ञांचे शिक्कामोर्तब; तज्ज्ञांच्या समितीकडून पालकमंत्र्यांना माहिती सादर

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) व रुग्णालय नांदगावपेठ येथील १८.५३ हेक्टर जागेवर उभारण्यास तज्ज्ञांच्या समितीने मान्यता दिली असून, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. नियोजित जागा ‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगा’च्या निकषांनुसार योग्य असल्याची माहिती तज्ज्ञांच्या समितीने महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांना सादर करून त्यांच्याशी चर्चा केली.

‘जीएमसी’साठी पालकमंत्र्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार जानेवारी, २०२१ मध्ये हा विषय कॅबिनेटपुढे येऊन सकारात्मक चर्चा झाली व अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविद्यालयासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. अमरावती येथील नांदगाव पेठमधील सुमारे १८.५३ हेक्टर शासकीय जमीनही उपलब्ध करून देण्यात आली. ‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगा’च्या (एनएमसी) निकषानुसार प्रस्तावित जागा, नियोजित रचनेबाबत अहवाल करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली. या समितीकडून नांदगावपेठ येथील जागेची पाहणी करण्यात आली. समितीने ही जागा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यासाठी योग्य असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे.

बातम्या आणखी आहेत...