आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलगीकरण:अमरावतीमध्ये कोरोनामुक्तीचा सलग दुसरा दिवस ; रुग्णांच्या निरनिराळ्या तपासण्या कराव्या लागतात

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात कुणालाही कोरोनाची लागण झाली नाही. शिवाय गेल्या दिवसभरापासून कुणीही या आजाराने विलगीकरणातसुद्धा नाही. त्यामुळे शनिवारपाठोपाठ आजचा रविवारही अमरावतीकरांसाठी खऱ्या अर्थाने कोरोनामुक्त ठरला. शनिवारी जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नव्हता. परंतु रविवारी काय चित्र असेल, हे सांगता येणार नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे होते. सुदैवाने आज दिवसभरात केलेल्या चाचण्यांमध्येही कुणालाच कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले नाही. वेगवेगळ्या दुर्धर आजारांमुळे दाखल होणाऱ्या रुग्णांच्या निरनिराळ्या तपासण्या कराव्या लागतात. अशावेळी कोरोनाची चाचणीसुद्धा केली जाते.

परंतु या चाचणीदरम्यान कुणालाही लागण झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे कोरोनामुक्तीचा आनंद सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७ हजार ११७ वर स्थिरावली असून सुटी घेऊन घरी गेलेल्यांचा आकडा १ लाख ५ हजार ४८९ झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...