आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मानित:शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव खाडे पुरस्काराने सन्मानित; या अतुलनीय कार्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे यांना वाड्मय क्षेत्रातील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. खाडे यांनी प्रशासकीय अधिकारी असतानाही साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. या अतुलनीय कार्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला.

श्री. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित नागपुरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये पहिल्या मायमराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनातच सत्काराचा हा कार्यक्रम पार पडला. मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य जयंत वडते, डॉ. महेंद्र ढोरे, साहित्यिक प्रा. डॉ. शोभा रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

खाडे यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या सचिव पदाची कारकीर्द सुरु करण्यापूर्वी अर्थात प्रशासकीय सेवेत असताना नियती व अउत्या या दोन कादंबरी लिहिल्या आहेत. त्यातील अउत्या ही कादंबरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित असून ती अस्सल साहित्याचा एक नमूना असल्याची अनेक साहित्यिकांची प्रतिक्रिया आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अमरावतीला आले होते. त्यावेळी त्यांनी या कादंबरीतील काही पाने वाचली. एवढेच नव्हे तर कार्यक्रमादरम्यान खाडे यांचे भरभरुन कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...