आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशातून अमरावतीत आलेला 435 किलो गांजा जप्त:3 महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेची दुसरी मोठी कारवाई

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिसातून पांढरकवडा- यवतमाळ- बाभूळगाव- चांदुर रेल्वे मार्गे अमरावती येथे ट्रक मधून गांजा तस्करी होत असल्याच्या गुप्त माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी पथकासह चांदुर रेल्वे ते अमरावती रोडवरील मालखेड गार्डन फाट्यालगत नाकाबंदी करून गांजा वाहतूक करणारा एक मिनी ट्रक पकडला.

यावेळी 435 किलो गांजा तसेच गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकला संरक्षण देणाऱ्या दोन कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यावेळी चार आरोपींनाही अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी उशीरा रात्री केली आहे.

ऋषभ मोहन पोहोकार (25, रा.रिद्धपुर ता.मोर्शी), विक्की बस्तीलाल युवनाते (20, रा.शिरजगाव कसबा ता.चांदुर बाजार), शेख अरबाज शेख इलियास, (19, आजाद नगर अमरावती) आणि

शेख तौसिफ शेख लतीफ (19, रा. रतनगंज खुर्शीदपुरा, अमरावती) या चौघांना अटक केली आहे. 435 किलो गांजा, वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा आयशर ट्रक, संरक्षण देणाऱ्या दोन कार असा एकूण 74 लाख 52 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याच प्रकारे 4 जून 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिवसालगत 26 लाख 60 हजारांचा गांजा पकडला होता. मागील तीन महिन्याच्या अंतरात स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात दाखल झालेली गांजाची मोठी खेप पकडली आहे.

गांजा वाहतूक करताना पोलिसांना संशय येऊ नये म्हणून गांजा तस्करांनी मालवाहू ट्रक मध्ये भाजीपाल्यासाठी वापरण्यात येणारे रिकामे कॅरेट ठेवले होते याच कॅरेटच्या खाली सुमारे चार ते पाच किलो वजनाचा एक अशा प्रकारे खाती रंगाचे ठोकळे तयार करून त्यामधून गांजा वाहतूक करण्यात येत होती. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी चांदुर रेल्वे जितेंद्र जाधव, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, पीएसआय मूलचंद भांबुरकर, संतोष मुंदाणे, रविंद्र बावणे, बळवंत दाभने, पंकज फाटे , दिनेश कनोजिया, मोहन मोरे, अमोल देशमुख, विलास रोकडे, निलेश डांगोरे नितीन कळमकर, प्रमोद शिरसाठ यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...