आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:मोहमंद अतिक मोहमंद हनीफची विद्यापीठ‎ विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड‎

शेदुरजनाघाटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड येथील महात्मा फुले कला,‎ वाणिज्य व सीतारामजी चौधरी महाविद्यालयातील‎ राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा माजी स्वयंसेवक‎ मोहम्मद अतिक मोहम्मद हनीफ याची संत गाडगे‎ बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तर्फे सत्र‎२०२२-२३ करिता विद्यार्थी‎ प्रतिनिधी म्हणून नुकतीच निवड‎ ‎ करण्यात आली आहे. मोहम्मद‎ ‎ अतिक मोहम्मद हनीफ याने सत्र‎ २०२१-२२ मधे रासेयो विद्यार्थी‎ ‎ प्रतिनिधी असताना केलेल्या‎ उत्कृष्ट कार्याची दखल घेत विद्यापीठातर्फे ही निवड‎ करण्यात आली.

मोहम्मद अतिक मोहम्मद हनीफ‎ सध्या एम.ए. भाग १ ला त्याच महाविद्यालयात‎ शिक्षण घेत असून, राष्ट्रीय सेवा योजनेचा माजी‎ स्वयंसेवक म्हणून नवीन रासेयो स्वयंसेवकांना‎ उत्कृष्टपणे मार्गदर्शन करतो. दरम्यान, विद्यापीठ‎ विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल प्राचार्य‎ डॉ जी.एन. चौधरी तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी‎ प्रा. डॉ. अतुल वंजारी, डॉ. रीना बकाले, रासेयोचे‎ सह-कार्यक्रम अधिकारी डॉ. अहमद शेहजाद तसेच‎ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर‎ कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...