आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेला २ जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे. यात मान्यताप्राप्त असणारे ३९ एकविध अधिकृत खेळाच्या क्रीडा प्रकाराचा समावेश असून, ५ ते ८ जानेवारीला तायक्वांदोची स्पर्धा होणार आहे.
यासाठी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सहसचिव व तायक्वांदो असोसिएशन ऑफ अकोला डिस्टिकचे महासचिव शिवाजीराव चव्हाण यांची मिनी ऑलिंपिक स्पर्धा २०२२ बालेवाडी पुणे करता वरिष्ठ सहाय्यक अधिकारीपदी महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, महासचिव नामदेव शिरगावकर व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल झोडगे, सचिव संदीप ओबासे, इंडिया तायक्वांदोचे सीईओ गफ्फार अब्दुल पठाण, शिवछत्रपती पुरस्कार विजेते भास्कर करकेरा यांनी नियुक्ती केली आहे.या निवडीबद्दल आमदार रणधीर सावरकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, विक्रम शर्मा, अविनाश राऊत, युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश गणगणे, क्रीडा सेलचे संजय देशमुख, योगेश तिवारी, रवींद्र तेलंग, आशिष वानखेडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.