आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:शालेय क्रिकेटपटूंची निवड चाचणी 10 रोजी

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ क्रिकेट संघटना नागपूरद्वारे प्रतिभावान क्रिकेटपटूंचा शोध घेण्याच्या उद्देशाने निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गतच अमरावती जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शनिवार १० रोजी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील क्रिकेट स्टेडियमवर सकाळी ८ वाजता निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

३० नोव्हेंबर पर्यंत शाळेतर्फे ज्या खेळाडूंची नोंदणी करण्यात आली आहे त्यांना या चाचणीला उपस्थित राहता येईल. ही चाचणी निशुल्क असून खेळाडूंना पूर्ण किटमध्ये यायचे असल्याचे अमरावती जिल्हा मावशी क्रिकेट संघटनेचे सचिव डॉ. दीनानाथ नावाथे यांनी कळवले.

बातम्या आणखी आहेत...