आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रीय परिसंवाद:शारदा लेले स्मृती पुरस्काराने‎ ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गाडे सन्मानित‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल‎ सोसायटी पुसा नवी दिल्ली यांच्या‎ द्वारे प्लांट अँड सॉईल हेल्थ‎ मॅनेजमेंट या विषयावर मैसूर‎ विद्यापीठ येथे शास्त्रीय परिसंवाद‎ घेण्यात आला. या परिसंवादाच्या‎ निमित्ताने संस्थेमार्फत वनस्पती रोग‎ शास्त्र विषयातील राष्ट्रीय‎ स्तरावरील सर्व शास्त्रज्ञांकडून‎ विविध पुरस्कारासाठी अर्ज‎ मागवण्यात आले होते.

याच‎ संस्थेद्वारे देण्यात येणाऱ्या शारदा‎ लेले स्मृती पुरस्काराची घोषणा‎ करण्यात आली. हा पुरस्कार‎ संशोधन क्षेत्रात वनस्पती रोग‎ शास्त्रविषयात उत्कृष्ट कार्य‎ करणाऱ्यांना देण्यात येतो. त्यासाठी‎ विविध बाबींवर १०० गुण ठेवण्यात‎ आलेले असून, या क्षेत्रात काम‎ करणाऱ्या जगभरातील शास्त्रज्ञांना‎ या पुरस्कारासाठी अर्ज‎ भरण्यासाठी पाचारण करण्यात‎ आले होते. ही प्रक्रिया ऑनलाइन‎ झाली.‎

यंदा या पुरस्कारासाठी डॉ.‎ राजेंद्र गाडे, सहयोगी अधिष्ठाता‎ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी‎ विद्यापीठ अकोला यांची गुणांच्या‎ आधारे निवड करण्यात आली‎ आहे. त्यांनी वनस्पती रोग शास्त्र‎ विषयात राष्ट्रीय स्तरावर केलेल्या‎ संशोधनात्मक कामाच्या आधारे‎ त्यांची निवड करण्यात आली. हा‎ पुरस्कार त्यांना मैसूर येथे झालेल्या‎ राष्ट्रीय संशोधन परिसंवादामध्ये‎ प्रदान करण्यात आला.‎ पुरस्काराच्या अनुषंगाने त्यांना‎ फायटोप्थेरा रोग : संत्रा पिकातील‎ मुख्य धोका या विषयावर व्याख्यान‎ देण्यास पाचारण करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...