आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध शस्त्रसाठा:जाकीर कॉलनीतून सात तलवारी, कोयता जप्त; गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील जाकीर कॉलनीत राहणाऱ्या राजा खानच्या घरी गुरुवारी (दि. १) उशिरा रात्री धाड टाकली. त्यावेळी पोलिसांनी राजा खानच्या घरातून सात तलवारी आणि एक कोयता असे अवैध शस्त्र जप्त केले आहे. राजा खान रहीम खान (३५, रा. जाकीर कॉलनी, अमरावती) याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राजा खानकडे माेठ्या प्रमाणात अवैध शस्त्र असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पीएसआय मुंडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह त्याच्या घरी धाड टाकली असता पोलिसांना सात तलवार व एक कोयता मिळाला. पोलिसांनी हे अवैध शस्त्र जप्त केले असून राजा खानला ताब्यात घेऊन नागपुरी गेट पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्याच्याविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राजा खान याचा संबंध तीन दिवसांपूर्वी पोलिस व महसूल पथकासह हल्ला करणाऱ्या वाळू माफियांसोबत असल्याचे पोलिसांनी सांगितले, त्यामुळेच ही कारवाई झाली आहे. आगामी काळात पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाई होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...