आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत तरुणीवर अत्याचार:पीडितेच्या जवाबावरून तरुणाविरुध्द गुन्हा दाखल; पीडिता 3 महिन्यांची गर्भवती

अमरावती19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका 22 वर्षीय तरुणाने 20 वर्षीय तरुणीसोबत ओळखीतून प्रेमसंबध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणीवर अत्याचार केला. यातून तरुणीला तीन महिन्यांची गर्भधारणा झाली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या बयाणावरुन गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी उशिरा रात्री अत्याचार करणाऱ्या मेळघाटातील गिट्टा गावातील 22 वर्षीय तरुणाविरुध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

सूरज प्रेमलाल धुर्वे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणी व सूरज यांची काही महिन्यांपूर्वी एका महिलेने ओळख करुन दिली. ओळख झाल्यानंतर दोघांचे एकमेकांसोबत मोबाईलवरुन संभाषण सुरू झाले. त्यांच्यात मैत्री व नंतर प्रेमसुत जुळले. त्यानंतर सूरजने पीडित तरुणीला भेटण्यासाठी बोलवून वारंवार लैंगिक अत्याचार केला. यातूनच पीडिता गर्भवती झाली. दरम्यान, पीडितेला प्रकृती अस्वास्थामुळे 10 जूनला येथील जिल्हा रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी गाडगेनगर पोलिसांना रुग्णालय प्रशासनाने माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी जावून पीडित तरुणीचे जवाब नोंदवले. त्यावेळी सूरज धुर्वेने हे कृत्य केल्याचे पीडितेने सांगितले. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी सूरज धुर्वेविरुध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घटनास्थळ हे धारणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे सदर गुन्हा शनिवारी धारणी पोलिसांकडे वर्ग केला असल्याचे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...