आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या २३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मंगळवारी मतमोजणी झाली. यावेळी तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायत येथील वाॅर्ड क्रं. १ मधील मतदारांनी चक्क नोटाला मतदान केले मात्र, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारा उमेदवार विजयी करण्याच्या निर्देशानुसार कमल नंदू ताथोड या ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून विजयी झाल्या आहेत. निवडणूक रिंगणात पसंतीचा उमेदवार नसल्यास मतदारांना ‘नोटा’चा पर्याय म्हणून वापर करता येतो. त्या अनुषंगाने बहुतांश निवडणुकीमध्ये ‘नोटा’चे मते अनेकांचे राजकीय भवितव्य बिघडवणारे व सावरणारे ठरते.
त्यामुळे ‘नोटा’ला निवडणुकीत महत्व आले. शहापूर येथील वाॅर्ड क्रं. १ च्या मतदारांनी ‘नोटा’ला सर्वाधिक पसंती दर्शवत १३५ मते दिली. तर दुसऱ्या क्रमांकावर कमल ताथोड यांना १३२, प्रिया मंगेश नितनवरे यांना १२० मते मिळाली या तीन पर्यायांमध्ये नोटापेक्षा तीन मते कमी पडलेले उमेदवार कमल ताथोड यांना आयोगाच्या निर्देशानुसार, विजयी करण्यात आले.
निवडणूक आयोगाने नोटा संदर्भात ६ नोव्हेंबर २०१८ च्या तरतुद क्रमांक १२.३ कडे लक्ष वेधून नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था, मनपा, नगर परिषद, नगर पंचायत यांना नोटा विजयाचा तर आदेश लागु होतो मात्र ग्रामंपंचायतीच्या निवडणूकीत हा आदेश लागु न करता १२ नोव्हेंबर १३ च्या आदेशानुसार नोटाला प्राप्त झालेल्या मतांची संख्या विचारात न घेता ज्या उमेदवारास सर्वाधिक मते मिळाली त्याला विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात येते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय मांडवे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.