आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होर्डिंग:शहरात अनधिकृत होर्डिंग ‘जैसे थे’ ; मनपा आयुक्तांचे फौजदारी कारवाईचे 2 महिन्यांपूर्वीच आदेश

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डिंग जमीनदोस्त केले जातील. तसेच यापुढे मनपाची परवानगी न घेता जे जाहिरात होर्डिंग लावतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, अशी घोषणा मनपा प्रशासक डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. परंतु, दोन महिने उलटले तरी अद्याप कोणत्याही अनधिकृत फलकावर कारवाई झालेली नाही. उलट शहरात मोठ्या प्रमाणात जाहिरातीचे फलक, होर्डिंग वाढल्याचे दिसत आहेत.

मनपा प्रशासकांनी बाजार व परवाना विभागाला यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले होते. तसेच अनधिकृत जाहिरात होर्डिंग काढण्यासाठी कंत्राटदार कंपनीची नियुक्ती करण्यासही सांगितले होते. त्यासाठी निविदाही निघाली. कंत्राटदार कंपनीही निश्चित झाली. केवळ कार्यारंभ आदेश देणेच काय ते बाकी आहे. प्रतीक्षा आहे ती विधी अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या हिरव्या झेंडीची. कारण यासंदर्भातील काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असून लवकरच त्यांचा निकाल लागणार आहे. त्यानंतर मनपा कारवाई करण्यास मोकळी असल्याची माहिती बाजार आणि परवाना विभागाद्वारे देण्यात आली आहे. विधी अधिकाऱ्यांनीच अनधिकृत जाहिरात होर्डिंग प्रकरणी कारवाई करण्याबाबत सध्या सबुरीचा सल्ला दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...