आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Shameful Act Of Lab Technician; Samples Taken From The Private Parts Of A Young Woman Who Went For A Corona Test, Filed A Case With The Police In Marawati

अमरावती:कोरोना चाचणीसाठी गेलेल्या तरुणीच्या गुप्तांगाचे घेतले सँपल, लॅब टेक्‍नीशियनविरोधात गुन्हा दाखल

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना चाचणीसाठी गेलेल्या तरुणीसोबत लॅब टेक्नीशियनने लाजीरवाने कृत्य केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. येथील बडनेरा मार्गावरील एका मोठ्या व्यापारी प्रतिष्ठानमध्ये काम करणारा एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे उर्वरित वीस कर्मचारी मंगळवारी बडनेरातील मनपाच्या मोदी हॉस्पीटलमध्ये रॅपिड अॅन्टीजेन टेस्टसाठी गेले होते. यामध्ये काही महिला कर्मचारीही होत्या.

दरम्यान एका 24 वर्षीय युवतीचा नोझ स्वॅब घेतल्यानंतर त्या ठिकाणी स्वॅब घेण्यासाठी कार्यरत कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञाने युवतीला सांगितले कि, आणखी एका ठिकाणचा स्वॅब घ्यावा लागतो. असे सांगून नको त्या ठिकाणचा स्वॅब घेतला. वास्तविकता कोविड चाचणीसाठी नाक, घसा या दोनच ठिकाणच्या स्त्रावाचे नमुने घेतले जातात, ही बाब पुढे आल्यानंतर पिडीत युवतीने मंगळवारी 28 जुलैला रात्री तक्रार दिली.

तक्रारीवरून पोलिसांनी या प्रयोगशाळा तंत्रज्ञाविरुध्द बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली. अलकेश अशोकराव देशमुख (28, रा. पुसदा) असे अटक झालेल्या कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे नाव आहे. पिडीत युवती ही बडनेरा मार्गावरील एका मोठ्या व्यापारी प्रतिष्ठानात कार्यरत आहे. 24 जुलैला या प्रतिष्ठानमध्ये काम करणारा एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंगळवारी दुपारी ‌या प्रतिष्ठानात काम करणारे वीस महिला- पुरूष कर्मचारी यांना घेवून याच व्यवस्थापक मोदी हॉस्पीटलमध्ये ‘रॅपिड अॅन्टीजेन’ चाचणीसाठी गेले. यावेळी चाचणीसाठी संशयिताच्या नाकातील स्वॅब घेतला. येथे स्वॅब घेण्याचे काम अलकेश देशमुख करत होता.

पिडीत 24 वर्षीय युवतीची रॅपिड चाचणी झाली, त्यावेळी नाकातील स्त्राव घेतला होता,तीची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे अलकेश देशमुखने सांगितले. तुम्हाला ‘युरिनल टेस्ट’ करावी लागेल, असे सांगितले. त्यावेळी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने ती युवती घाबरली होती. तरीही तीने अलकेशला विचारणा केली कि, ती टेस्टसाठी महिला कर्मचारी नाही का, मात्र महिला कर्मचारी नसल्याने पिडीत युवतीने महिलेला सोबत घेतले. त्यानंतर बाजूच्या खोलीत अल्केशने या युवतीचा नको त्या ठिकाणचा स्वॅब घेतला. काही वेळातच सांगितले कि, तुमची ही टेस्ट निगेटीव्ह आली. त्यानंतर पिडीतेने हा प्रकार भावाला सांगितला. भावाने इर्विन रुग्णालयात चौकशी केली असता कोरोना चाचणीसाठी नाक, घसा या दोनच ठिकाणाहून स्त्राव घेणे गरजेचे आहे. स्वॅब घेणाऱ्या त्या कंत्राटी कर्मचाऱ्याने अश्लील वर्तन केल्याचे लक्षात आले. पिडीतेला मोबाइलवर टेक्स्ट मॅसेज आला तिने विचारले कोण तर त्याने पुन्हा मॅसेज करून सांगितले कि, तुझे स्वॅब घेतले ना. यामुळे पिडीता मंगळवारी बडनेरा ठाण्यात गेली, अलकेश देशमुखविरुद्ध तिने तक्रार दिली. नंतर पोलिसांनी बलात्कार, विनयभंग, अॅट्रॉसिटी, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, त्याला 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती बडनेराचे ठाणेदार पंजाबराव वंजारी यांनी दिली.