आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीची संवाद बैठक:शरद पवार 10 रोजी अमरावतीत; राष्ट्रवादीची संवाद बैठक

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती विभागात राष्ट्रवादीला नवी बळकटी देण्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संवाद बैठक १० एप्रिलला रोजी दुपारी ३ वाजता शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.

या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. संवाद बैठकीला विभागातील पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, मंत्री, आमदार, जिल्हा निरीक्षक सर्व जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या सर्व फ्रंटचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

या संवाद बैठकीच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते संजय खोडके यांनी विभागातील पाचही जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...