आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा‎ निकाल जाहीर:अमरावती विभागात शेंदुरजनाघा प्रथम‎; स्वच्छ शहर चार राज्यातील 295 नगर परिषदांमधून दुसरा क्रमांक‎

शेंदुरजनाघाट‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार वितरण ‎सोहळा नुकताच नवी दिल्ली येथील ‎तळकोटरा स्टेडियमवर राष्ट्रपती‎ द्रौपदी मुर्मू, केंद्रीय आवासन व शहरी ‎ ‎ कार्य मंत्रालय मंत्री हरदीपसिंग पुरी ‎यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. १) ‎पार पडला. या वेळी रॅंकिंग पोर्टलचे ‎ ‎ राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन ‎करून स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा‎ निकाल जाहीर करण्यात आला.‎

त्यामध्ये शेंदुरजनाघाट नगर परिषदेने‎ अमरावती विभागातील सर्व नगर‎ परिषदा, महानगर पालिकेतून पहिला‎ व पश्चिम विभागातील महाराष्ट्र,‎ मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान‎ या चार राज्यांमधील २९५ नगर‎ ‎परिषदांमधून दुसरा क्रमांक‎ पटकावला.‎ शेंदूरजनाघाट शहराने राष्ट्रीय‎ पातळीवर एक लाखापेक्षा कमी‎ लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये‎ ४२ वा क्रमांक प्राप्त केला असून,‎ पहिल्या १०० शहरांमध्ये नाव असणारे‎ अमरावती विभागातून एकमेव शहर‎ ठरले आहे.

अमरावती विभागातील‎ सर्व नगर परिषद,‎ महानगरपालिकामधून पहिला, तर‎ भारतातील पश्चिम विभागामध्ये‎ येणाऱ्या राज्यातील २९५ नगर‎ परिषदांपैकी दुसरा क्रमांक, तसेच‎ राज्यातील ९० नगर परिषद‎ श्रेणीमधूनही दुसरा क्रमांक‎ पटकावला आहे. याशिवाय‎ अमरावती विभागातून सलग दोन‎ वेळा कचरा मुक्त शहर थ्री स्टार‎ प्रमाणीकरण मिळवणारे शहर ठरले‎ आहे. मागील वर्षी शेंदुरजनाघाट न.‎ प.ने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये १० क्रमांक‎ मिळवला होता.

याबद्दल‎ मुख्याधिकारी तथा प्रशासक रवींद्र‎ पाटील, आरोग्य निरीक्षक रणजित‎ सोनेकर, न. प.चे शहर समन्वयक‎ विक्रम खोडके, सर्व स्वच्छता‎ कर्मचारी, स्वच्छता दुतांसह‎ शहरवासीयांचे सर्वत्र कौतुक व‎ अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत‎ आहे. या उपलब्धीचे श्रेय नागरिक व‎ स्वच्छता कर्मचारी यांना जात‎ असल्याचे मुख्याधिकारी रवींद्र‎ पाटील यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...