आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक निवडणूक:शिक्षक बँक निवडणूक : आज कळणार उमेदवारांची संख्या ; मतमोजणीअंती निकाल घोषित केला जाणार

अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणूक मैदानातून बाहेर पडण्याचा शेवटचा दिवस उद्या, सोमवार, २० जून आहे. त्यामुळे उद्या सायंकाळी या निवडणुकीतील उमेदवारांची नेमकी संख्या स्पष्ट होणार आहे. शिक्षक बँकेच्या २१ सदस्यीय संचालक मंडळासाठी आगामी २ जुलैला निवडणूक होत असून ३ जुलै रोजी मतमोजणीअंती निकाल घोषित केला जाणार आहे. सदर निवडणुकीसाठी गेल्या २७ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरु झाले होते. या दरम्यान १२२ उमेदवारांनी १९४ अर्ज दाखल केले होते. यापैकी बोटावर मोजण्याइतपत उमेदवारांनीच माघार घेतली. सदर निवडणुकीत चार मुख्य पॅनल असून त्यांचे उमेदवारही उद्याच्या माघारीनंतर स्पष्ट होणार आहेत. दरम्यान उमेदवारी मागे घेण्यासाठी ६ ते २० जून हा कालावधी राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवार, २१ जूनला निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी घोषित होईल.

बातम्या आणखी आहेत...