आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार‎:शिरजगाव कसबा पोलिसांनी दोन महिलांसह चार जणांना केली अटक‎

अमरावती‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या‎ हद्दीत एका नातेवाइकाकडे पाहुणी‎ म्हणून आलेल्या एका १७ वर्षीय‎ मुलीला दारू पाजून दोघांनी अत्याचार‎ केला. यावेळी दोन महिलांनीसुद्धा त्या‎ दोघांना सहकार्य केले, अशी तक्रार‎ पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांत‎ दिली. तक्रारीवरून पोलिसांनी‎ रविवार, १२ मार्चला रात्री गुन्हा दाखल‎ करून अत्याचार करणाऱ्या दोघांसह‎ चौघांना अटक केली आहे.‎ अटक केलेल्या चौघांपैकी दोन‎ महिलांना एमसीआर मिळाला आहे.‎ पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून, पीडित‎ तरुणी ही ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या‎ तिच्या एका नातेवाइकाकडे ६ मार्चला‎ आली होती. त्याचदरम्यान दोघांनी‎ पीडित मुलीला दारू पाजली.

त्यानंतर‎ ते दोघे घरात आले. पीडितासुद्धा त्याच‎ घरात होती. त्यानंतर दोन महिलांनी‎ बाहेरून घराचे दार बंद करून त्या‎ निघून गेल्या. त्यावेळी दोघांनीही‎ पीडितेवर अत्याचार केला. हा प्रकार‎ घडल्यामुळे मुलगी घाबरली. ती‎ तातडीने तिच्या बहिणीच्या गावी‎ निघून गेली व तिने बहिणीला हा‎ घटनाक्रम सांगितला. त्यानंतर‎ रविवारी पीडित मुलीने शिरजगाव‎ ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून‎ पोलिसांनी या दोघांसह दोन महिला‎ अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल‎ करून त्यांना अटक केली आहे.‎ अशी माहिती शिरजगाव कसबा‎ पोलिसांनी दिली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...