आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​सहकार क्षेत्र:शिव सहकार सेनेची जिल्हा कार्यकारिणी गठीत; शिवसहकार सेना जिल्हा संघटकांची नियुक्ती

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना प्रणीत शिवसहकार सेनेला बळकट करण्यासाठी नव्या जोमाने काम करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा संघटकांची नियुक्ती केली आहे. जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे पत्रपरिषदेत शिवसेना सहकार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये राज्याच्या सहकार सेनेच्या प्रमुख शिल्पा सरपोतदार तथा उपाध्यक्ष प्रदीपकुमार खोपडे याच्या वतीने अमरावती जिल्हा सहकार सेनेनची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सोपवली आहे.

यानुसार गोपाल राणे यांच्याकडे अमरावती, भातकुली, मोर्शी, वरूड, धामणगांव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगांव खंडेश्वर, तिवसा तसेच अरूण खारोडे यांच्याकडे दर्यापूर अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, अचलपूर, धारणी, चिखलदरा या तालुक्यांची जबाबदारी सोपवली. याशिवाय तालुका संघटक (प्रमुख) पदी सहकार क्षेत्रात कार्यरत शिवसैनिक यांची नियुक्ती केली.. यात अमरावतीकरीता संदीप जैन (अंतोरा सेवा सहकारी संस्था), भातकुली- दत्तात्रय कुचे (संचालक विर्शी सेवा सहकारी संस्था), मोर्शी-संजय पुंड (संचालक, पोरगव्हाण सेवा सहकारी संस्था), वरूड - दिलीप पोहणे (मच्छीमार संघटना, वरूड), धामणगांव रेल्वे - दिलीत तरोण (कृउबास, धामणगांव) चांदूर रेल्वे सूर्यकांत यादव (सेवा सहकारी संस्था), नांदगांव खंडेश्वर प्रमोद ठाकरे (संचालक, कृउबा समिती नांदगाव खंडेश्वर), तिवसा अनिल काळमेघ (उपाध्यक्ष, भांबोरा सेवा सहकारी संस्था), दर्यापूर विजय अढाऊ (माजी संचालक, कृउबास दर्यापूर), अंजनगांव सुर्जी प्रदीप गिरनाळे (माजी संचालक, कृउबास अंजनगांव), चांदूर बाजार पंकजराव निंबोरकर (सेवा संस्था) अचलपुर - पोपटराव घोडेराव (माजी संचालक, कृउबास अचलपूर), धारणी - राजाभाऊ राठोड (सदस्य, सेवा संस्था), चिखलदरा-मंगललाल सुर्वे (सेवा संस्था) यांची नियुक्ती केली. गोपालराव राणे, अरूण पाटील खारोडे, सुधीर सूर्यवंशी, मनोज कडू, नानाभाऊ नागमोते, विलास माहुरे, किशोर माहुरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...