आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत शिवसेना कार्यालयाची तोडफोड:घटनेमागे राणा समर्थकांचा हात असल्याचा शिवसैनिकांचा आरोप, घटनास्थळी पेट्रोलची बाटलीही सापडली

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 14 दिवसांपासून राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याची आज सुटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावतीत खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या समर्थकांचा जल्लोष सुरू आहे. अशातच आता अमरावतीतील शिवसेना कार्यालयाची काल रात्री तोडफोड करण्यात आल्याचे समोर येत आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राणा समर्थकांनीच ही तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. काल राणा दाम्पत्याला जामीन मिळाल्याचे वृत्त मिळताच राणा समर्थकांनी हे कृत्य केल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्री काही मद्यपींनी शिवसेनेच्या कार्यालयात घुसून तेथील सामान अस्ताव्यस्त फेकत नासधूस केली. घटनास्थळावरून पेट्रोलची बाटलीदेखील जप्त करण्यात आली आहे. यावरून ऑफिस पेटवण्याचा राणा समर्थकांचा डाव होता, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेली पेट्रोलची बाटली.
घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेली पेट्रोलची बाटली.
बातम्या आणखी आहेत...