आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:शिवसैनिकांची विमा कंपनीच्या प्रतिनिधीस मारहाण; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील प्रकार

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीच्या मूग तसेच उडदाचा पीक विमा न मिळाल्याने त्यासंदर्भात जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीस मारहाण केली. त्यावेळी काही शेतकरीही उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात हा प्रकार बुधवार ८ रोजी दुपारच्या सुमारास घडला. संतप्त शिवसैनिकांच्या जमावाने कार्यालयात तोडफोडही केली.

दर्यापूर शिवसेना तालुका प्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात शिवसैनिक व शेतकऱ्यांनी बुधवारी दुपारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक दिली. अंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मूग आणि उडीद या पिकासाठी काढलेला पीक विमा अद्यापही का भेटला नाही? असा जाब त्यांनी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी नितीन सावळे यांना विचारला. त्यावर केंद्र व राज्य सरकारकडून त्यांच्या हिस्स्याची रक्कम आली नसल्याने पैसे वितरित करता आले नाही, असे उत्तर सावळे यांनी दिले. राज्य सरकारने पैसे दिले नाही असे अनपेक्षित उत्तर मिळाल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी नितीन सावळे यांच्या कानशिलात लगावत सरकारला बदनाम करू नका, अशी ताकीद दिली.

ही घटना घडली त्यावेळी कार्यालयात जिल्हा कृषी अधिकारी हजर नव्हते. ते एका बैठकीत व्यस्त होते. त्याचप्रमाणे इतर उच्चपदस्थ अधिकारीही त्यावेळी कार्यालयात हजर नव्हते. बराच वेळ हा गोंधळ सुरू राहिला. त्यानंतर शिवसैनिकांनी आपला मोर्चा कंपनीच्या जिल्हा कार्यालयावर वळवला. मात्र तेथे आधीच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात तालुका प्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात सुमारे ३० च्या वर शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...