आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत शिवसेनेचा ‘नांगर' आक्रोश:ओला दुष्काळ लागू करण्यासाठी शिवसेना आक्रमक; कोश्यारी यांचा केला निषेध

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्याला ओल्या दुष्काळाच्या मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता तालुक्यात ओल्या दुष्काळाची मदत जाहीर करावी, यासाठी तालुका शिवसेनेद्वारे (उद्धव ठाकरे) सोमवारी (दि. 21) नांगर आक्रोश मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

तालुक्यात सततच्या पावसाने पिकांचे नुकसान होवूनही तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने तालुका शिवसेनाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात बैल बंडीसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. सरकारच्या विरोधात घोषणा देत हा मोर्चा दुपारी बारा वाजता नवीन बसस्थानक येथून निघून तहसील कार्यालयात पोहचला. या वेळी तहसील कार्यालय बैलंबडी व शिवसैनिकांनी भरून गेले होते. तहसीलदार अभिजीत जगताप यांना ओल्या दुष्काळासह विविध चौदा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या मोर्चात जिल्हा प्रमुख सुनील खराटे, महानगर प्रमुख पराग गुडधे, तालुका प्रमुख कपील देशमुख, महीला आघाडी जिल्हा प्रमुख मनीषा टेंभरे, प्रतीभा बोपशेट्टी, शहर प्रमुख राजेंद्र आकोटकर, युवासेना जिल्हा प्रमुख प्रमोद धानोरकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रेमकुमार बोके, माजी जि. प. उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, विकास येवले, महेंद्र दिप्टे, देविदास वाळके, विजय होटे, बळीरामजी धर्मे, गजानन लवटे, प्रवीण नेमाडे, सचिन गावंडे, अभिजीत भावे, श्याम येऊल, महेश खारोडे, गजानन चौधरी, आशिष चौधरी, सतीश चऱ्हाटे, अक्षय गवळी, सागर काळबांडे, पंकज मोदी, बाबाराव गिरनाळे, बाळासाहेब काळमेघ, अंबादास माकोडे, अंकित सारंदे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक वक्तव्याबद्दल शिवसेना आक्रमक झाली असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज याच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध होत आहे. असे असताना सोमवारी (दि. 21) अंजनगाव सुर्जी तालुका शिवसेनेद्वारे तहसील कार्यालयाजवळ भगतसिंग कोश्यारी यांच्या पोस्टरला चपला मारत निषेध केला. या वेळी तालुक्यातील शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...