आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिवसेनेचे ‘नांगर आक्रोश आंदाेलन

अंजनगाव सुर्जी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्याला ओल्या दुष्काळाच्या मदतीपासून वंचित ठेवले आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता तालुक्यात ओल्या दुष्काळाची मदत जाहीर करावी यासाठी तालुका शिवसेनेद्वारे (उद्धव ठाकरे) सोमवारी नांगर आक्रोश मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

तालुक्यात सततच्या पावसाने पिकांचे नुकसान होऊनही तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने तालुका शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात बैल बंडीसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. सरकारच्या विरोधात घोषणा देत हा मोर्चा दुपारी १२ वाजता नवीन बसस्थानक येथून निघून तहसील कार्यालयात पोहोचला. या वेळी तहसील कार्यालय बैलंबडी व शिवसैनिकांनी भरून गेले होते. तहसीलदार अभिजीत जगताप यांना ओल्या दुष्काळासह विविध १४ मागण्यांचे निवेदन दिले.

या मोर्चात जिल्हा प्रमुख सुनील खराटे, महानगर प्रमुख पराग गुडधे, तालुका प्रमुख कपिल देशमुख, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनीषा टेंभरे, प्रतिभा बोपशेट्टी, शहर प्रमुख राजेंद्र आकोटकर, युवासेना जिल्हा प्रमुख प्रमोद धानोरकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रेमकुमार बोके, माजी जि. प. उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, विकास येवले, महेंद्र दिप्टे, देविदास वाळके, विजय होटे, बळीराम धर्मे, गजानन लवटे, प्रवीण नेमाडे, सचिन गावंडे, अभिजीत भावे, श्याम येऊल, महेश खारोडे, गजानन चौधरी, आशिष चौधरी, सतीश चऱ्हाटे, अक्षय गवळी, सागर काळबांडे, पंकज मोदी, बाबाराव गिरनाळे, बाळासाहेब काळमेघ, अंबादास माकोडे, अंकित सारंदे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राज्यपालांच्या पोस्टरला चपला मारून निषेध : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याबद्दल शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध होत आहे. दरम्यान सोमवारी अंजनगाव सुर्जी तालुका शिवसेनेद्वारे तहसील कार्यालयाजवळ भगतसिंह कोश्यारी यांच्या पोस्टरला चपला मारत निषेध केला. या वेळी तालुक्यातील शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...