आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्याची परवानगी द्यावी:शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव सुरु झाला असून आगामी 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव तर 5 ऑक्टोंबरला दसरा व 9 ऑक्टोबरच्या ईद निमित्त सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम, देखावे, शोभायात्रांचे आयोजन केले जाते. या सर्व उत्सवांमध्ये डी. जे. वाजविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट पाटील यांनी केली आहे.

त्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून याबाबत तातडीने पावले उचलली जावी, असे त्यात लिहिले आहे. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी अमरावती शहरात 3 सप्टेंबर ते 12ऑक्टोंबरपर्यंत कलम 144 लागू केले आहे. या आदेशानुसार गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान डी.जे वाजविता येणार नाही. याशिवाय आंदोलन, घोषणाबाजी, बॅनर लावणे, कॅसेट वाजवणे यावरही प्रतिबंध आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी त्यांचे अधिकार वापरून ते शिथिल करावेत, असे गोपाल अरबट पाटील यांच्या निवेदनाचे म्हणणे आहे.

कोरोनामु‌ळे गेल्या दोन वर्षांपासून कोणताही उत्सव साजरा करण्यात आलेला नाही. परंतु यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावा, अशी घोषणा खुद्द राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेली आहे. मात्र पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशामुळे गणेश भक्तांना हा उत्सव साजरा करताना संकोच वाटत असून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाला तत्काळ स्थगिती देण्यात यावी आणि गणेशोत्सव, दुर्गाेत्सव हे चांगल्या पद्धतीने साजरे करण्याची परवानगी देण्यात यावी, असे त्यांच्या निवेेदनाचे म्हणणे आहे. यावेळी सुनील केणे, अतुल सगणे पाटील, विनय गावंडे, सचिन कोरडे, रोहित खंडारे, आकाश नारोळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...