आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:शिवाजी संस्थेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलची आगेकूच, 4 उमेदवार विजयी

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नऊ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीचा कौल प्रगती पॅनलच्या बाजूने झुकताना दिसतो आहे. रात्री पावणेबारा वाजेपर्यंत या निवडणुकीतील कार्यकारिणी सदस्यांच्या चार जागांचा निकाल हाती आला असून, त्यामध्ये प्रगती पॅनलने बाजी मारली.कार्यकारिणीच्या चार सदस्यांसाठी एकूण १० जण मैदानात होते. त्यापैकी हेमंत काळमेघ (४९०), केशवराव गावंडे (३८७), सुरेश खोटरे (३३१) व सुभाष बनसोड विजयी झाले. पराभूत सहा उमेदवारांमध्ये दिनकर गायगोले, सुरेंद्र आडे, रमेश हिंगणकर, आनंद देशमुख, प्राध्यापक प्रमोद झाडे व नरहरपत होले यांचा समावेश आहे.

‘शिवाजी’च्या कार्यकारी परिषदेची निवडणूक रविवारी सकाळी ८ ते ५ या वेळात पार पडली. ७७४ पैकी ६७२ (८६.८२ टक्के) जणांनी मतदान केले. सायंकाळी ७.३० वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. मतदानासाठी मतपत्रिका वापरण्यात आल्याने मत मोजणीची प्रक्रिया हळूहळू पुढे जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. बी.के. गांधी यांच्या कार्यालयातील सूत्रांच्या माहितीनुसार शेवटचा निकाल रात्री अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान घोषित होईल. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी प्रगती पॅनलचे हर्षवर्धन देशमुख विकास पॅनलचे नरेशचंद्र ठाकरे यांच्याच लढत होत आहे. मावळते अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या कार्यकारिणीतील उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे व कार्यकारिणी सदस्य केशवराव मेटकर यांनी इतर सात नव्या सवंगड्यांना सोबत घेत विकास पॅनलची स्थापना केली आहे. तर स्वत:सह जुने सहा सहकारी आणि इतर तिघांना सोबत घेत हर्षवर्धन देशमुख यांनी प्रगतीचा झेंडा रोवला. याशिवाय तिघांनी अपक्ष दावेदारी केल्याने एकूण उमेदवारांची संख्या २१ वर पोहोचली. प्रगती पॅनलमध्ये अध्यक्षपदासाठी स्वतः हर्षवर्धन देशमुख, कोषाध्यक्षपदासाठी दिलीप इंगोले, उपाध्यक्षपदासाठी डॉ. रामचंद्र शेळके, अॅड. गजानन पुंडकर व अॅड जयवंत पाटील पुसदेकर रिंगणात आहेत. तर दुसरीकडे विकास पॅनलतर्फे अध्यक्ष पदासाठी नरेशचंद्र ठाकरे, कोषाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब वैद्य, उपाध्यक्ष पदासाठी डॉ. अशोक अरबट, केशवराव मेतकर व प्रा. शरद तसरे मैदानात आहेत.

बातम्या आणखी आहेत...