आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील तहसिल कार्यालयाच्या मागील बाजूला भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका 45 वर्षीय व्यक्तीने 40 वर्षीय शिक्षीका पत्नीचा गळ्यावर चाकूचा वार करुन खुन केला. त्यानंतर स्वत: गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिस व नागरीकांनी धाव घेतली. त्यामुळे तो व्यक्ती बचावला आहे. हा थरकाप उडवणारा घटनाक्रम शुक्रवारी (दि. 5) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे.
श्रृतिका सतीश काळबांडे (40) असे मृतक महिलेचे नाव आहे तर सतिश उर्फ किशोर काळबांडे (45, रा.कोल्हा काकडा, ता. अचलपूर ह.मु. महात्मा फुले कॉलनी, चांदुर बाजार) असे गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. किशोर काळबांडे हे मागील काही महिन्यांपासून चांदूर बाजार शहरात पत्नी श्रृतिका, मुलगा श्रीजीत यांच्यासह भाड्याच्या घरात राहत होते. श्रृतिका या चांदूर बाजार येथील एका खासगी शाळेत शिक्षीका म्हणून कार्यरत होत्या.
गुरूवारी (दि. 4) काळबांडे यांचे घरमालक संजय भाविक हे कुटूंबियासह बाहेरगावी गेले होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्यासुमारास श्रृतिका यांच्या किंचाळण्याचा आवाज परिसरातील नागरीकांना गेला. त्यामुळे पोलिसांना माहीती देत नागरीकांनी काळबांडे यांचे घर गाठले. त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा आतमधून बंद होता. त्याचवेळी पोलिस पोहचले, त्यानंतर पोलिस व नागरीकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर सतिश काळबांडे फासावर लटकले होते तर श्रृतिका रक्तबंबाळ अवस्थेत त्याच ठिकाणी खाली पडून होत्या. यावेळी तत्काळ सतिष यांनी घेतलेल्या फासाची दोरी कापून त्यांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले व नंतर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. सतिशने पत्नी श्रृतिकाचा खून का केला, याबाबत काही समोर आले नव्हते. दरम्यान चांदूर बाजार पोलिसांनी श्रृतिकांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन सतिश काळबांडेविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.