आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन; अंजनगाव सुर्जी शहरात पाणी प्रश्न पेटला

अंजनगाव सुर्जी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंजनगाव शहरातील काही भागातील नागरी वस्तींमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने सचिन गावंडे व माजी नगरसेवक सचिन जायदे यांच्या नेतृत्वात गुरुवारी (दि. १६) पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन करण्यात आले.

मजीप्रामार्फत नवीन टाकलेली पाइपलाइन व पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, नवीन टाकीचे काम युद्धस्तरावर पूर्ण करुन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, शहरातील दूषित पाणीपुरवठ्याची प्रश्न निकाली काढा, अर्ज प्राप्त झाल्यापासून दोन दिवसांच्या अवधीत समस्येचे निराकरण करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी आठ दिवसांपूर्वी ‘मजीप्रा’ला निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याची दखल घेण्यात न पाण्याच्या टाकीवर चढून घोषणाबाजी करत आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न माजी नगरसेवक सचिन जायदे, सचिन गावंडे, मुजीब भाई व कार्यकर्त्यांनी केला.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यासाठी वारंवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदने देखील दिले. मात्र, अंजनगाव शहरातील पाण्याचा प्रश्न मिटत नसल्यामुळे अखेर पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन करण्यात आले. एक महिन्याच्या आत प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या लेखी आश्वासन दिल्यानंतर शोले स्टाइल आंदोलन मागे घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...