आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्याम चौक स्थित जे अँन्ड डी मॉलमधील एका व्यापाऱ्याला झालेल्या जबर मारहाणीच्या निषेधार्थ आजूबाजूच्या सहा बाजारओळीतील दुकानदारांनी आज, बुधवारी बंद पाळला. मारहाण करणाऱ्यावर गंभीर गुन्हे दाखल करा, अशी त्यांची मागणी होती. दरम्यान पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचे मान्य केल्यानंतर आजू-बाजूच्या दुकानदारांसह या मार्केटमधील प्रतिष्ठानच्या संचालकांनी आपापले व्यवहार सुरु केले.
दरम्यान, काळात व्यापाऱ्यांनी मनपाचे प्रशासक डॉ. प्रवीण आष्टीकर यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उपलब्ध नसल्याने उपायुक्त नरेंद्र वानखडे यांची भेट घेतली. त्यांनी प्रतिनिधीमंडळाचे म्हणणे ऐकून घेत तत्काळ प्रभावाने अतिक्रमण हटावची कारवाई सुरु केली. दुपारपर्यंत त्या भागातील काही हातगाड्या, अनावश्यक फलक, काही टेबल-खुर्च्या जप्त करण्यात आल्या होत्या. सिटी कोतवाली पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीनुसार दुकानाचे फलक लावण्याच्या मुद्द्यावरुन मंगळवारी रात्री प्रदीप मतानी यांच्यासोबत अन्य एका दुकानदाचा वाद झाला.
हा वाद विकोपाला गेल्यानंतर संबंधितांनी मतानी यांना जोरदार मारहाण केली. त्यामुळे हा मुद्दा पोलिसात गेला. परंतु पोलिसांनी साधारण कलमे नोंदवून मारहाण करणाऱ्याला अभय दिल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. नेमक्या याच मुद्यावरुन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही या प्रकरणात उडी घेतली. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करीत दुपारपर्यंतची आघाडी सांभाळली गेली. व्यापाऱ्यांच्या मते मॉलमध्ये काही दुकानदारांनी अनधिकृतपणे फलकं लावली आहेत. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. परिणामी ती लावण्यात आलेली जादाची फलके, पार्कींगच्या जागेवर आजूबाजूच्या अतिक्रमणधारकांनी ठेवलेल्या हातगाड्या, आणि मार्केटसमोरच्या खुल्या जागेवर दररोज होत असलेले अतिक्रमण यापासून त्यांची सुटका करुन द्यावी आदी मुद्दे मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे यांची भेट त्यांच्या पुढ्यात ठेवण्यात आली.
प्रशासकांशी चर्चेअंती कारवाई
मॉलमध्ये अनधिकृतपणे लावण्यात आलेले फलक जप्त करा, थकीत मालमत्ता कराची वसुली कडक करुन बेशिस्त वागणाऱ्या व्यापाऱ्यांना लगाम लावा, स्वच्छतागृहाजवळ जाणीवपूर्वक लावली जाणारी फलके हटवा, पार्कींग मोकळे करा आदी मागण्या व्यापाऱ्यांनी रेटल्या आहेत. याबाबत मी मनपाचे प्रशासक डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार आहे. दरम्यान अतिक्रमण हटवण्याची कारवाई तत्काळ प्रभावाने सुरु करण्यात आली आहे. नरेंद्र वानखडे, उपायुक्त, मनपा. अमरावती.
पदाधिकाऱ्यांनी उचलला मुद्दा
यादरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही व्यापाऱ्यांची बाजू घेत पोलिस आणि मनपा प्रशासनाला धारेवर धरले. भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, माजी महापौर चेतन गावंडे, स्थायी समितीचे माजी सभापती तुषार भारतीय व सचिन रासने आदींनी त्यांचे नेतृत्व केले. व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळासोबत भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाणे व मनपात पोहचून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.