आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:श्रीकांत भारतीय यांच्या विजयाचा जल्लोष ; भाजप गोटात आनंदाची लहर

अमरावती7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणुकीत श्रीकांत भारतीय यांच्या विजयाची वार्ता शहरात पसरताच भाजप गोटात आनंदाची लहर पसरली. त्यांच्या विजयाचा शहरात सोमवार २० रोजी रात्री जल्लोष करण्यात आला.

भारतीय हे मूळ अमरावतीकर असून राजकारणाचा त्यांना दांडगा व्यासंग राहिला आहे. त्यामुळेच विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. ती सार्थ ठरवत त्यांनी विजय संपादन केला. भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांच्या घरापुढे ढोल-ताशांच्या तालावर नृत्य, भगव्या पताका, फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. माजी महापौर चेतन गावंडे यांनी तुषार भारतीय यांना पेढा भरवून त्यांचे तोंड गोड केले. भारतीय यांनी प्रामाणिक परिश्रम घेत काम केले. त्यांचा विजय ही त्याचीच पावती असल्याची प्रतिक्रिया त्यांचे बंधू माजी मनपा पक्षनेते तुषार भारतीय यांनी व्यक्त केली. यावेळी माजी महापौर चेतन गावंडे, प्रशांत शेगोकार, प्रवीण तायडे, राजेश पाठक, माजी स्थायी समिती सभापती राधा कुरील, माजी नगरसेविका रेखा भुतडा, माजी नगरसेवक श्रीचंद तेजवानी, बलदेव बजाज, बादल कुळकर्णी, प्रणीत सोनी, मंदार नानोटीसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या नेत्रदीपक विजयाचा आनंदोत्सव : विधान परिषद निवडणुकीत आ. श्रीकांत भारतीय तसेच भाजपने मिळवलेल्या ऐतिहासिक यशाचा आनंदोत्सव शहरात साजरा होत आहे. आ. भारतीय यांचे यश हे नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे मत माजी महापौर चेतन गावंडे यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...